एक विचार… जो हजारो गावांचा चेहरा बदलतोय!

फक्त ₹20,000 गुंतवून स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि दर महिन्याला ₹1,47,000 पर्यंत कमवा.

भारत ई-सेवा केंद्र म्हणजे काय?

भारत ई-सेवा केंद्र ही केवळ डिजिटल सेवा देणारे स्थळ नाही — तर ही एक चळवळ आहे, जी सामान्य माणसाला स्वतःचं स्थिर उत्पन्न आणि गावाला गरजेच्या सर्व सेवा देण्याची ताकद देते.


आपल्या गावातला प्रत्येक व्यक्ती मोबाईल वापरतो, पण अजूनही अनेकांना शासकीय सेवा व योजना, शैक्षणिक व इतर कागदपत्रे, विविध डिजिटल सेवा, नोकरीची संधी शोधण्यासाठी, विविध कला-कौशल्य शिकण्यासाठी, आर्थिक योजना किंवा डिजिटल प्रशिक्षणासाठी आणि अशा अनेक कामांसाठी तालुक्याला जावं लागतं. आपल्या महाराष्ट्रात, भारतात आणि जगभरामध्ये अशा अनेक सेवा आणि संधी आहेत ज्यांचा लाभ माहिती नसल्याने तुम्हांला घेता येत नाही, हे सर्व चित्र बदलण्यासाठी, तुम्हांला डिजिटल युगातील सर्व संधींशी जोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

डिजिटल उद्योजक तयार करा – गावाचा विकास घडवा!

भारत ई-सेवा केंद्र – तुमच्या यशाचा डिजिटल भागीदार.

  • आमचं ध्येय
  • आमचा दृष्टिकोन
  • आमची उद्दिष्टं
  • आमची मूल्यं
  • संस्थेची स्थापना आणि हेतू

आमचं ध्येय

  • महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक जबाबदार आणि सक्षम डिजिटल उद्योजक घडवणे, जो आपल्या परिसरातील नागरिकांना उपयुक्त सेवा देईल आणि स्वतःचं यश घडवेल.

  • सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनमान्य सेवा पोहोचवून, त्यांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ घरपोच मिळवून देणे.

  • महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील नागरिकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण, रोजगार, व्यवसाय व तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी मिळवून देण्यासाठी सक्षम करणे.

  • प्रत्येक डिजिटल उद्योजकाला तंत्रज्ञान, योग्य शिक्षण, स्थिर उत्पन्न आणि सामाजिक सन्मान मिळवून देऊन त्याला आत्मनिर्भर बनवणे.

आमचा दृष्टिकोन




प्रत्येक गावात एक डिजिटल उद्योजक उभे करणे – जे आपल्या भागातील लोकांना आधुनिक सेवा, माहिती आणि उत्पन्नाचं दार उघडून देतील.




आमची उद्दिष्टं

  • कमी गुंतवणुकीत, जास्त उत्पन्न देणाऱ्या व्यवसायाच्या संधी ग्रामीण तरुणांसाठी उपलब्ध करून देणे.

  • बेरोजगार, महिला व तरुणांना डिजिटल युगासाठी तयार करून त्यांना स्वतःचं उत्पन्न आणि सामाजिक सन्मान मिळवून देणे.

  • डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गावोगावी सेवा पोहोचवून, प्रत्येक घरात ‘सोप्या भाषेत, विश्वासार्ह’ सुविधा उपलब्ध करून देणे.

  • सरकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवून, त्यांना सक्षम आणि माहितीपूर्ण बनवणे.

  • 2025 संपेपर्यंत महाराष्ट्रात 1000 भारत ई-सेवा केंद्रे सुरू करून, हजार कुटुंबांना उत्पन्न, आणि लाखो लोकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचा आमचा ठाम संकल्प आहे.

आमची मूल्यं

स्वावलंबन

प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं काम, स्वतःची ओळख, आणि सन्मानानं जगण्याची संधी मिळाली पाहिजे — हेच आमच्या संकल्पनेचं मुळं आहे.

सहजता

सेवा देताना अडथळा नको – ना भाषेचा, ना प्रक्रियेचा.सगळं सोप्प, स्पष्ट आणि लोकांना समजेल असंच असावं, हीच आमची भूमिका.

सततचा साथ

एकदा व्यवसाय सुरू केला की तो त्याच्या भरवशावर टाकून दिला जात नाही — आम्ही प्रत्येक टप्प्यावर त्या उद्योजकाच्या सोबत आहोत,प्रशिक्षण, मार्गदर्शन, मार्केटिंग आणि प्रत्येक अडचणीला उत्तर देण्यासाठी.

संवेदनशीलता

आमच्यासाठी प्रत्येक सेवा ही एक फॉर्म नाही,ती कोणाच्यातरी गरज आहे.शेवटच्या माणसालाही समजून घेणं आणि त्याचं आयुष्य सोप्प करणं — हेच आमचं ध्येय आहे.

सामूहिक यश

ही वाटचाल ‘मी’ ची नाही – ‘आपण’ ची आहे.ज्या क्षणी एक उद्योजक कमावतो,त्याच क्षणी एक गाव डिजिटली सक्षम होते.हे यश सगळ्यांचं आहे.

संस्थेची स्थापना आणि हेतू

भारत ई-सेवा केंद्र ही SWAB technologoies Pvt. Ltd. या कंपनीचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. "Digitally Empowering. Bharat" या उद्दिष्टाने, आमची टीम मागील 15+ वर्षांपासून ग्रामीण डिजिटल अभियान, शासकीय भागीदारी, स्टार्टअप इनोव्हेशन आणि रोजगार निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे.



संस्थापक व प्रमुख टीमबद्दल

आमची टीम ही अनुभवी, समर्पित आणि यशस्वी भारत घडवण्यासाठी कटिबद्ध आहे.

सचिन सर – सह-संस्थापक आणि सेवा व प्रशिक्षण प्रमुख

Co-Founder & Director – Chief of Service Innovation

"मी अशा तरुणांसाठी काम करतोय, जे शिकलेले असतात… पण त्यांना कुठून, कसं, आणि काय सुरू करावं हेच कळत नाही. भारत ई-सेवा केंद्र ही त्यांच्या सुरुवातीची दिशा आहे – जिथून ते शिकतात, कमावतात आणि इतरांना मदत करतात." जमिनीवर काम करणाऱ्या माणसाला कोणती सेवा कशी समजेल, आणि त्यातून उत्पन्न कसं वाढेल, हे नेमकं ओळखण्याचं कसब सचिन सरांकडे आहे.

भारत ई-सेवा केंद्रातील प्रत्येक सेवा मॉडेल तयार करणं, वापरण्यास सोपं सॉफ्टवेअर डिझाइन करणं, आणि नवीन फ्रँचायझींना प्रशिक्षण देणं हे ते अत्यंत तळमळीने करतात. सचिन सरांची खासियत म्हणजे गावपातळीवर काम करणाऱ्या माणसाला सेवा कशी समजेल, ती कशी शिकवावी आणि त्यातून उत्पन्न कसं मिळेल, हे ते अत्यंत अचूकपणे ओळखतात – आणि त्या पद्धतीने संपूर्ण सिस्टीम डिझाईन करतात.

Train-the-Trainer Modules, SOPs, Interactive Practical Sessions, Field Testing – हे सगळं ते स्वतः तयार करतात आणि अंमलात आणतात. प्रत्येक नवीन उद्योजक जेव्हा “सर, आता मला लोकांशी सेवा देता येते आणि उत्पन्नही वाढतंय” असं सांगतो – तेव्हा त्यांना वाटतं, “हे केवळ प्रशिक्षण नव्हे… हे एका कुटुंबाच्या भविष्याची सुरुवात आहे.” "प्रत्येक सेवा ही केवळ अर्ज नाही – ती कोणाच्यातरी आयुष्यातली गरज आहे," असा त्यांच्या कामामागचा भाव असतो.



अजय भोसले – सह-संस्थापक आणि मुख्य ब्रँड व विस्तार प्रमुख

Co-Founder & Director- Chief Brand & Growth Strategist

"मी अशा पिढीसाठी काम करतोय, ज्यांच्याकडे क्षमता आहे… पण संधी नाही! भारत ई-सेवा केंद्र त्याचं उत्तर आहे – एक व्यवसाय, एक ओळख, एक सुरुवात भविष्यासाठी!"

अजय सरांच्या दृष्टीकोनात हा व्यवसाय हा फक्त उत्पन्नाचं साधन नाही, तर तो ग्रामीण भारताच्या स्वाभिमानाची आणि स्वावलंबनाची सुरुवात आहे. आज भारत ई-सेवा केंद्र उभं आहे, जेणेकरून प्रत्येक गावात एक तरुण, महिला किंवा बेरोजगार व्यक्ती आपली ओळख, उत्पन्न आणि मानाचं स्थान मिळवू शकेल.

संकल्पनेच्या मुळापासून ब्रँड उभा करण्यापर्यंत आणि गावोगाव पोहोचवण्यापर्यंतच्या संपूर्ण धोरणात्मक दृष्टीकोनाचं नेतृत्व सर करतात. त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये ब्रँडिंग, फ्रँचायझी मॉडेल डिझाईन, मार्केट स्ट्रॅटेजी, प्रचार योजना, भागीदारी विकास आणि विस्तार मोहिमा यांचा समावेश आहे. अजय भोसले सरांना यांना गावपातळीवरील मानसिकता, सामाजिक रचना आणि डिजिटल संधी यांचं सखोल आकलन आहे.

त्यामुळे ते तयार करत असलेलं प्रत्येक धोरण, फ्रँचायझी मॉडेल किंवा अभियान हे फक्त व्यवसायासाठी नसून, गावाच्या विकासासाठी केंद्रबिंदू ठरतं. त्यांच्या नेतृत्वात भारत ई-सेवा केंद्राने “Mission 1000” सारखी दीर्घकालीन योजना सुरू केली आहे, ज्यामधून गावोगावात नवउद्योजक घडवले जात आहेत आणि लाखो लोकांपर्यंत सेवा पोहोचते आहे.

"मी व्यवसाय निर्माण करत नाही, मी संधी निर्माण करतो – जी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवते." असा त्यांचा दृष्टीकोन आहे.



युवराज दिसले – प्रकल्प संचालक

Project Director – Strategic Partnerships & Rural Network

युवराज दिसले सर हे भारत ई-सेवा केंद्र प्रकल्पातील नेटवर्किंग आणि ग्रामीण जनसंपर्क धोरणाचे नेतृत्व करत आहेत.

गावपातळीवर लोकांशी संवाद साधणे, स्थानिक विश्वास मिळवणे, जिल्हा आणि तालुकास्तरावर भागीदारी तयार करणे आणि सरकारी/सामाजिक प्रतिनिधींना या प्रकल्पाशी जोडणे – ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे.

"गावाचा विकास हवा असेल, तर गावातल्या माणसावर विश्वास ठेवायला हवा – आणि तो विश्वास तयार करणं, हे माझं काम आहे," असा त्यांचा स्पष्ट दृष्टिकोन आहे.



सुनील पवार – प्रकल्प संचालक

Project Director – Field Operations & Execution

सुनील पवार सर हे प्रकल्पाच्या ऑन-ग्राउंड अंमलबजावणी, फ्रँचायझी सेटअप प्रक्रिया आणि कार्यक्षमतेच्या नियंत्रणाचं प्रमुख नेतृत्व सांभाळतात. केंद्र कुठे उभे करायचे, कसे सुरू करायचे, किती वेळात पूर्ण करायचे – याची संपूर्ण यंत्रणा त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असते.

त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली दर्जेदार सामग्री, तांत्रिक यंत्रणा, ट्रेनिंगसाठीची पूर्वतयारी आणि केंद्र स्थापनेपासून उद्घाटनापर्यंतची सर्व टप्प्यांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. त्यांच्या कामामुळेच भारत ई-सेवा केंद्र “स्टार्ट टू सर्व्ह” वेळेत संपूर्ण आणि व्यवस्थित सुरू होणारे मॉडेल म्हणून ओळखलं जाते.

"प्रत्येक केंद्र हे केवळ नावासाठी नको – ते चालतंय, टिकतंय, आणि यश देतंय, हे मी पाहतो. कारण यश हे फक्त सुरू करण्यात नाही – ते टिकवण्यात असतं," हे त्यांचं कामाविषयीचं तत्व आहे.

Go Back Top